मोबाईल स्टोअरमध्ये मायलेकींचा राडा,कर्मचाऱ्यांना केली मारहाण

मोबाईल स्टोअरमध्ये मायलेकींचा राडा,कर्मचाऱ्यांना केली मारहाण

  • Share this:

22 फेब्रुवारी : दिल्लीतील राजौरी गार्डन येथे एका मोबाईल स्टोरमध्ये 3 महिलांनी जोरादार राडा केला. या तिनही महिला एकाच घरातील असून माय लेकी आहेत. हा वाद झाला मोबाईल बदलण्यावरून...

delhi555घडलेली हकीकत अशी की, एका मुलीने या मोबाईल स्टोरमधून मोबाईल विकत घेतला होता आणि त्याचा इन्शुरन्स घेतला होता. मात्र मोबाईल बिघडला म्हणून त्या इन्शुरन्स कंपनीकडे गेली. पण कंपनी बंद होती, म्हणून आपला बिघडलेला मोबाईल घेऊन ती स्टोअरमध्ये आली आणि मोबाईल बदलून देण्याची मागणी केली.

यावरुन स्टोअरच्या कर्मचारी आणि तिच्यात वादावादी झाली.  त्याचे पर्यायाने रुपांतर हाणामारीत झालं. या महिलांनी स्टोरची तोडफोड करतं कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा सर्व राडा मोबाईलमध्ये कैद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 22, 2017, 5:59 PM IST

ताज्या बातम्या