S M L

अलाहबादमध्ये प्रचार शिगेला

Sonali Deshpande | Updated On: Feb 22, 2017 10:31 AM IST

अलाहबादमध्ये प्रचार शिगेला

22 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे, आणि त्यासाठी जोरदार प्रचार सुरूय. भाजप अध्यक्ष अमित शहांनी काल अलाहबादमध्ये रोड शो केला.जवळपास १० किलोमीटर हा रोड शो सुरू होता.झेंडूच्या फुलांनी मढलेल्या एका ट्रकवर अमित शहा उभे होते.जय श्री राम आणि हर हर मोदी अशा घोषणा दिल्या जात होत्या.

rahul-akhilesh3अमित शहा जिथे प्रचार करत होते, त्याच्या मागच्याच रस्त्यावर राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांचा एकत्र रोड शो सुरू होता. बेबी को बेस पसंद है, या गाण्याच्या धर्तीवर यूपी को अखिलेश पसंद है, अशा घोषणा सपाचे कार्यकर्ते देत होते.यूपीमध्ये सपा आणि काँग्रेसनं युती केलीय. पण भाजपनंही प्रतिष्ठेची निवडणूक केल्यामुळे यूपीमध्ये कुणाची सत्ता येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 09:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close