1000 रुपयांची नवी नोट चलनात येणार

1000 रुपयांची नवी नोट चलनात येणार

  • Share this:

100022 फेब्रुवारी : नोटबंदीच्या निर्णयानंतर बंद झालेली 1,000 रुपयाची नोट आता नव्या रूपात येणार आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकारने 1000 रुपयाच्या नोटांची नवी मालिका चलनात आणण्याचा निर्णय घेतलाय. आरबीआयने या 1000 रुपयाच्या नोटेची छपाईही सुरू केलीय, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. याआधी 1000 रुपयाची नोट जानेवारी महिन्यातच आणण्याची सरकारची योजना होती पण 500 रुपयांच्या नोटा छापण्याची गरज असल्यामुळे हे काम थोडं लांबणीवर पडलं.

नव्या रूपातली 1000 रुपयांची नोट नेमकी कधी चलनात येणार याबद्दल अजून माहिती कळू शकलेली नाही. याआधी नोटबंदीच्या निर्णयानंतर सरकारने 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. पण नोटबंदीनंतर सुट्या पैशांची समस्या मात्र कायम राहिली. आता 1000 रुपयांची नोट आल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, अशी अपेक्षा आहे.

नोटबंदीनंतर बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा घालण्यात आली होती. 20 फेब्रुवारीनंतर ही मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलीय. आता 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्याच्या सगळ्या मर्यादा उठवण्यात येतील. नोटबंदीनंतर बँकांमध्ये जुन्या नोटांच्या स्वरूपात किती रुपये जमा झाले याची एकत्रित आकडेवारी अजूनही सरकारने दिलेली नाही. पण नोटबंदीनंतर बँकांमधल्या ठेवींमध्ये मात्र मोठी वाढ झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 22, 2017, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading