Elec-widget

तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

तामिळनाडू विधानसभेत पलानीस्वामींनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

  • Share this:

swearing-in ceremony IN cHENNAI

18 फेब्रुवारी : तामिळनाडूत सत्त संघर्षला पूर्ण विराम मिळाला असून अखेर तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. त्यांनी 122 आमदारांच्या पाठिंब्यासह तामिळनाडू विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला.

द्रमुकच्या आमदारांनी तोडफोड आणि गदरोळ केल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अण्णद्रमुकचे आणि पन्नीरसेल्वम गटाचे आमदार उपस्थित होते. द्रमुकचे 88 आणि आययूएमएलच्या एक असे मिळून 89 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं होतं.

235 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेमध्ये शशिकला गटाच्या पलानीस्वामी यांनी 124 आमदारांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केलं होतं त्यापैकी 122 जणांनी त्यांच्याबाजूनं मत दिली. अखेर तामिळनाडूचे राजकीय नाट्य संपले असेच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com