तामिळनाडू विधानसभेत तुफान राडा

तामिळनाडू विधानसभेत तुफान राडा

  • Share this:

tamilnadu18 फेब्रुवारी : विश्वासदर्शक ठरावादरम्यान तामिळनाडू विधानसभेत अभूतपूर्व राडा सुरू आहे. विरोधीपक्षातला द्रमुक पक्षाचे आमदारांनी गोंधळ घातला. या गोंधळात विधानसभेचा एक कर्मचारी जखमी झाला, आणि त्याला रुग्णवाहिकेत घालून रुग्णालयात न्यायची वेळ आली.

तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री के. पलनीसामी आज बहुमत सिद्ध करणार आहेत. त्यासाठी विधानसभेत आवाजी मतदान सुरू होतं. पण हे मतदान उघड नको, तर गुप्त पद्धतीनं करा, अशी मागणी द्रमुकचे आमदार करू लागले, आणि गोंधळ घालू लागले. तुम्ही सभागृहाबाहेर जा, असे आदेश अध्यक्षांनी दिले, आणि त्यानंतर या आमदारांनी कोणतंही तारतम्य बाळगलं नाही. द्रमुकच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली आणि खुर्च्या फेकायला लागले अध्यक्षांचे दोन माईकही त्यांनी फोडले.तामिळनाडूच्या तरुणांनी यावर तीव्र नाराजी सोशल मीडियावर व्यक्त होण्यास सुरूवात झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2017, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading