17 फेब्रुवारी : बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज यांनी काल नोटाबंदीवर सडकून टीका केली.'नोटाबंदीची अंमलबजावणी चुकली नाही.ती आयडियाच अतिशय चुकीची आहे, त्यानं काहीही फायदा झालेला नाही,' असं बजाज म्हणाले. 'एखादी कल्पना सुंदर असेल तर अंमलबजावणीत काही अडचणी येत नाहीत,'असंही ते म्हणाले.
बजाज म्हणाले, ' उपाय किंवा आयडिया जर अचूक असेल, तर ती लगेच यशस्वी होते. उदहरणार्थ नोटाबंदी. नोटाबंदीची आयडियाच चुकीची आहे. आणि असं असल्यावर अंमलबजावणीला दोष देऊन उपयोग काय? नवीन गोष्टी विकसित करणं हे जर सरकारी परवानग्या आणि न्यायप्रक्रियेवर अवलंबून असणार असेल, तर ते मेड इन इंडिया नाही, तर मॅड इन इंडिया होईल. आमची नवी चारचाकी गाडी भारतात विकण्यासाठी आम्हाला ५ वर्षांपासून परवानगीच मिळत नाहीय. '
बजाज यांच्या टू-व्हीलर व्यवसायावर नोटाबंदीमुळे वाईट परिणाम झाला, हे आकड्यानिशी सिद्ध झालंय.गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद करत नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशभरात निर्माण झालेला चलनकल्लोळ ताजा आहे. यातून अद्याप देश सावरलेला नाही. नोटाबंदीच्या या निर्णयाचा फटका अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांना बसला. वाहन उद्योगही त्याला अपवाद ठरलेला नाही.
या पार्श्वभूमीवर नॅसकॉम नेतृत्व परिषदेत बोलताना राजीव बजाज यांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले. दुचाकी वाहनांच्या विक्रीवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे. उत्तम पाऊस आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आलेली तरतरी याच्या जोरावर दुचाकी खरेदी व्यवहार वाढतात. मात्र, नेमक्या याच कालावधीत नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम दुचाकी वाहनांच्या खपावर झाला. डिसेंबर महिन्यात बजाजच्या दुचाकी विक्रीत ११ टक्क्यांनी घट झाली.
मेड इन इंडिया अभियानावरही त्यांनी टीका केली. 'मी गेली ५ वर्ष ४ चाकांची सायकल भारतात लाँच करण्याचा प्रयत्न करतोय.पण मला परवानगी मिळत नाहीय.अशा परिस्थितीत मेक इन इंडियाचं करायचं काय,' असा सवाल त्यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा