औरंगाबाद,बीडमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र,सुषमा स्वराज यांची घोषणा

औरंगाबाद,बीडमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र,सुषमा स्वराज यांची घोषणा

  • Share this:

passport-seva-kendra17 फेब्रुवारी : मराठवाड्याच्या जनतेला आता पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर किंवा पुण्याची चक्कर मारावी लागणार नाहीय. कारण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी औरंगाबाद आणि बीडसाठी पासपोर्ट सेवा केंद्राची घोषणा केलीय. तसं ट्विटही स्वराज यांनी केलंय.

 

31 मार्चपासून ही सेवा सुरू होईल. बजेटमध्येही पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट मिळण्याची घोषणा केली गेलीय. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय युद्ध पातळीवर कामाला लागलंय. त्यानुसार त्या त्या राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आता पासपोर्ट केंद्र सुरू केली जातायत.

बीड आणि औरंगाबादमध्ये पासपोर्ट केंद्र करण्याची मागणी केली जात होती. आता त्याची पुर्तता होतेय. पासपोर्टसारखंच बीडला रेल्वेनेही लवकर जोडावं अशी इच्छा बीडकरांची आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 10:25 AM IST

ताज्या बातम्या