S M L

'नोकिया 3310' पुन्हा होतोय लाँच

Sonali Deshpande | Updated On: Feb 16, 2017 03:56 PM IST

'नोकिया 3310' पुन्हा होतोय लाँच

15 फेब्रुवारी : नोकियाने आपला पहिला मोबाईल फोन 3310 पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत उतरवतोय. मजबूत बॉडी आणि मोठ्या बॅटरी बॅकअपमुळे तो लोकांच्या मोठा पसंतीला उतरला होता. नोकिया 3310 हा मोबाईल लोकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केला होता. नोकिया एकेकाळी मोबाईल प्रॉडक्ट्मधली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जायची. मात्र नंतर स्मार्टफोन्स आले आणि हे छोटे फोन मागे पडले.

नोकिया हा 3310 फोन बाजारात पुन्हा लाँच करतोय. मात्र तो स्मार्टफोन असेल की फीचर फोन हे मात्र नक्की नाही. कारण स्मार्टफोन्सच्या जमान्यात हे फोन्स कितपत यशस्वी ठरतील,हा प्रश्न आहे. हा फोन 17 वर्षांपूर्वी 2000ला भारतात लाँच झाला होता. स्मार्टफोन्स वापरणाऱ्या लोकांना पर्याय म्हणून हा फोन लाँच करण्याचा नोकियाचा मानस असेल.

या महिन्यात बार्सिलोनात होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस या टेक इव्हेंटमध्ये हा फोन नोकिया लाँच करू शकते. त्याच्या किमतीचा काही अजून अंदाज आलेला नाही. याचसोबत नोकिया अँड्रॉईड फोन्सवरही काम करतंय. त्यांनी नुकतंच नोकिया 6 आणि नोकिया E1 फोनची घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 01:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close