S M L

पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

Sonali Deshpande | Updated On: Feb 16, 2017 01:13 PM IST

पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

16 फेब्रुवारी : तामिळनाडूमध्ये सुरू असलेलं राजकीय नाट्य अखेर संपलंय. कारण ईपीएस पलानीस्वामी हे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री होणारेत. राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज सकाळी पलानीस्वामी यांना आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी राजभवनावर पाचारण केलं.

यावेळी पलानीस्वामी यांनी आपल्याला 123 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालांना सादर केलं. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी पलानीस्वामी यांना 15 दिवसांचा अवधी दिला. त्यानुसार पलानीस्वामी हे आज संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन कार्यभार स्वीकारणारेत.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सुरू असलेल्या नाट्याची अखेर झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 01:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close