Elec-widget

शशिकला अखेर पोलिसांना शरण,बंगळूरच्या तुरुंगात रवानगी

शशिकला अखेर पोलिसांना शरण,बंगळूरच्या तुरुंगात रवानगी

  • Share this:

sashikala15 फेब्रुवारी : अखेर शशिकला आज बंगळुरूत शरण आल्या पण त्या आधी चेन्नईतून निघताना त्यांनी खूप ड्रामेबाजी केली आणि पक्षावर आपलच नियंत्रण  राहण्यासाठी व्यवस्थाही केली.

अम्मांच्या समाधीस्थळी जावून शशिकलांनी आज सकाळी ही नौटंकी केली. .अम्मांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत येईन...असा निश्चिय चिन्नमांनी केल्याचं कार्यकर्ते सांगतात.

त्याआधी त्यांनी एमजीआर यांच्या स्मृतीस्थळी जाऊन काही क्षण ध्यानही केलं. डोळे मिटल्यावर त्यांना त्यांना गेल्या तीन दशकात केलेले आपलेच कारनामे दिसले असतील.

तामिळनाडूच्या राजकारणात अशा नाटकबाजीला विशेष महत्व आहे. या आधीही प्रत्येक नेत्यानं अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी अशाच कृती केल्याचे असंख्य दाखले आहेत..

हे सगळे उपचार पूर्ण करून शशिकला पोलिसांना शरण येण्यासाठी बंगळुरकडं रवाना झाल्या. तुम्हाला तातडीनं शरण यावच लागेल अटक टाळता येणार नाही असं सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर शशिकलांकडे शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नाही. आता साडेतीनवर्ष शशिकलांना बंगळुरूमधल्या तुरूंगात काढावी लागतील. याआधी सहा महिने  त्यांनी तुरूंगात काढली आहेत. जयललिता असत्या तर त्यांनाही हीच शिक्षा भागोवी लागली असती.

Loading...

तुरूंगात जाण्याआधी पक्षावर पूर्ण नियंत्रण राहिल याची व्यवस्था शशिकलांनी केलीय. आपला पुतण्या टीटीव्ही दिनकरन याची पक्षाच्या उपसरचिटणीसपदी नियुक्ती केली. दिनकरन् वरही भ्रष्टाचाराचे आरोप असून शशिकलांच्या भ्रष्ट टोळीचा तो सदस्य आहे. 2011 मध्ये शशिकलांसह याटोळीतल्या 12 जणांची जयललितांनी पक्षातून हकालपट्टी केली होती. आता शशिकलांनी त्याच लोकांना पुन्हा जवळ केलंय.

आता जयललिताही नाहीत आणि शशिकला तुरूंगात आहेत. अशा कठिण काळात अण्णाद्रमुकची पुढची वाटचाल ही काटेरी असणार आहे...हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...