इस्रोचा विश्वविक्रम, 104 उपग्रह एकाच वेळी अंतराळात

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 10:32 AM IST

इस्रोचा विश्वविक्रम, 104 उपग्रह एकाच वेळी अंतराळात

isro latest

15 फेब्रुवारी : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा इथून (बुधवार) सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे.

भारताच्या 3 सॅटेलाईटचं एकूण वजन 768किलो आहे तर राहिलेल्या 101 सॅटेलाईटचे एकूण वजन 600किलो आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे आपले सॅटेलाईट लाँच करण्यासाठी लागणारा निम्मा खर्च इस्रोने बाकी देशांकडून आधीच मिळवला आहे.

अवघड काय? इस्रोला हे 104 सॅटेलाईट एकमेकांना न धडकता पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करायचे आहेत. यासाठी एक विशेष कोड बनवण्यात आला आहे जो या शेकडो सॅटेलाईटना वेगवेगळ्या वेळी (stages) वेगवेगळ्या दिशेने (direction) वेगवेगळ्या परस्परावलंबी गतीमध्ये (relative velocity) अंतराळात सोडणार आहे.

भारताचे उपग्रह

Loading...

१) कार्टोसॅट २ ( ७१४ किलो वजन )

२) INS 1A

३) INS 1B

( दोन्ही मिळून ३० किलो वजन )

परदेशी उपग्रह

१) अमेरिका - ९६ मायक्रो उपग्रह

२) इस्त्रायल - १ मायक्रो उपग्रह

३) नेदरलँड - १ मायक्रो उपग्रह

४) कझाकस्तान - १ मायक्रो उपग्रह

५) स्वित्झर्लंड - १ मायक्रो उपग्रह

६) युनायटेड अरब अमिरात - १ मायक्रो उपग्रह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...