104 उपग्रहांचं काऊंट डाऊन सुरू

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2017 10:37 AM IST

Isro2

15 फेब्रुवारी : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो आज जागतिक विक्रम करणार आहे. इस्त्रो आपल्या पीएसएलव्ही सी ३७ या रॉकेटच्या सहाय्याने तब्बल 104 उपग्रह अंतराळातील भूस्थिर कक्षेत सोडून, शतक साजरे करणार आहे.

आज सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी, सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून हे सर्व विक्रमी उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. आणि त्याची उलट गणतीही सुरू झाली आहे.

या आधी रशियाने सर्वाधिक ३७ आणि अमेरिकेच्या नासाने २९ उपग्रह अंतराळात एकाचवेळी सोडले आहेत. त्यामुळे भारताच्या या विक्रमी कामगिरीकडे सर्व जगाचे लक्ष लागलंय. इस्त्रो जे १०३ उपग्रह अंतराळात सोडणार आहे. त्यापैकी भारताचे ३ उपग्रह आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2017 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...