जाता जाता शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची केली पक्षातून हकालपट्टी

जाता जाता शशिकला यांनी पन्नीरसेल्वम यांची केली पक्षातून हकालपट्टी

  • Share this:

sashikla_vs_ panneerselvam  14 फेब्रुवारी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरल्यानंतरही व्ही. के. शशिकला यांचे कारनामे सुरूच आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी अवघ्या दोन तासांच्या आत शशिकला यांनी ओ.पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी के. पलानीस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे शशिकला यांच्या अनुपस्थितीत पलानीस्वामी हेच अण्णा द्रमुकचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील, हे स्पष्ट झालंय. के. पलानीस्वामी हे सध्या तामिळनाडू सरकारमध्ये महामार्ग मंत्री म्हणून काम पाहतायत.

तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्षात जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. पण शशिकला यांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे आता त्या मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.

सुरवातीला शशिकला यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ओ. पन्नीरसेल्वम यांनी नंतर त्यांच्याविरोधात बंड पुकारलं आणि पक्षात फूट पडली. पन्नीरसेल्वम यांच्या या भूमिकेनंतर शशिकला यांनी आपल्या समर्थक आमदारांना कोवथूर इथल्या एका रिसॉर्टमध्ये ठेवलंय पण आता हे आमदार नेमके कुणाच्या बाजूने जातील यावर तामिळनाडूमधली सत्तेची समीकरणं ठरणार आहेत.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर आज शशिकला यांनी याच रिसॉर्टमध्ये आमदारांशी चर्चा केली आणि नेतेपदी पलानीस्वामी यांनी निवड केली. त्यामुळं शशिकला यांच्याऐवजी आता ते मुख्यमंत्रिपदावर दावा सांगतील. अर्थात, त्यासाठी त्यांना पन्नीरसेल्वम यांच्याशी राजकीय संघर्ष करावा लागणार असून राज्यपालांनी सरकार स्थापण्याचं आमंत्रण दिल्यानंतरही विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 5:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading