चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहण्याची सक्ती नाही- सुप्रीम कोर्ट

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहण्याची सक्ती नाही- सुप्रीम कोर्ट

  • Share this:

dashday

14 फेब्रुवारी : राष्ट्रगीत हा चित्रपट किंवा माहितीपटाचा भाग असेल तर  चित्रपटगृहातील प्रेक्षकांना त्याच्या सन्मानार्थ उभे राहण्याची गरज नाही, असं सुप्रीम कोर्टाने आज आज (मंगळवारी) स्पष्ट केलं. यावेळी सुप्रीम कोर्टात आपल्या यापूर्वीच्या आदेशात सुधारणा केली.

सुप्रीम कोर्टाने 30 नोव्हेंबरला दिलेल्या आदेशात व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रगीताच्या वापरावर बंदी आणली होती. तसंच देशभरातील चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवणंही कोर्टाने सक्तीचं केलं होतं. चित्रपटगृहातील प्रत्येक प्रेक्षकाने राष्ट्रगीताचा सन्मान केलाच पाहिजे, असंही कोर्टाने म्हटलं होतं. केवळ अपंग व्यक्तींनाच या नियमातून सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर चित्रपट राष्ट्रगीताचा भाग असल्यास उभं राहावं किंवा नाही, याबद्दलचा वाद सुरू झाला होता. अखेर आजच्या निकालादरम्यान कोर्टाने याबाबतचं धोरण स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading