शशिकला यांना सुप्रीम कोर्टानं सुनावली 4 वर्षांची शिक्षा

शशिकला यांना सुप्रीम कोर्टानं सुनावली 4 वर्षांची शिक्षा

  • Share this:

sasikala12

14 फेब्रुवारी : व्ही. के. शशिकला यांना सुप्रीम कोर्टानं ४ वर्षांची शिक्षा सुनावलीय. त्यांना 10 कोटींचा दंडही ठोठावलाय.त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलंय. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कोर्टानं त्यांना ही शिक्षा सुनावलीय. पुढची १० वर्षं आता शशिकलांना निवडणूक लढवता येणार नाही.

सध्या तामिळनाडूत शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांच्यात सत्तासंघर्ष सुरूय. पण आता शशिकला या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेल्यात. याचा अर्थ पन्नीरसेल्वम यांचा मार्ग मोकळा झालाय, असं नाही. कारण संख्याबळ शशिकलांकडेच आहे. त्यामुळे त्या आता त्यांच्या एका निष्ठावंताला पुढे करतील, याची दाट शक्यता आहे.

२० वर्षांपूर्वीच्या बेहिशेबी मालमत्तेत जयललिताही आरोपी होत्या. कर्नाटक हायकोर्टानं अम्मा आणि शशिकलांना निर्दोष मुक्त केलं होतं. पण सुप्रीम कोर्टानं हा निर्णय रद्द करत शशिकलांना मोठा दणका दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading