S M L

शशिकलांचा आज फैसला,सुप्रीम कोर्टाचा निकाल

Sonali Deshpande | Updated On: Feb 14, 2017 09:52 AM IST

shashikala

14 फेब्रुवारी : शशिकला यांना तामिळनाडूचं मुख्यमंत्रीपद मिळण्यातील सर्वात मोठा अडथळा ठरलेल्या खटल्याचा अखेर आज निकाल लागण्याची शक्यता आहे. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत आरोपी असलेल्या शशिकला यांचे राजकीय अस्तित्व सर्वोच्च न्यायालयातील याच खटल्याच्या निकालावर अवलंबून आहे.

बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याच्या खटल्यात जयललिता आणि शशिकला यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर कर्नाटक सरकारने या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. जयललिता यांचं निधन झाल्याने या खटल्यातून त्यांचं नाव वगळण्यात येईल. पण शशिकला तसेच त्यांचे नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि इलावारसी यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.या खटल्याचा निकाल विरोधात गेल्यास मुख्यमंत्रिपदाचं त्यांचं स्वप्न भंगल्यात जमा आहे. विशेष म्हणजे याच खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा असल्याने अद्याप राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शशिकला यांच्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 09:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close