S M L

कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार चोरणारे अटकेत

Samruddha Bhambure | Updated On: Feb 12, 2017 07:36 PM IST

Kailash satyarthi123

12 फेब्रुवारी :  नोबेल पुरस्काराचे मानकरी, ज्येष्ठ समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा लागला असून पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सत्यार्थींचे नोबेल पुरस्काराचं सन्मानचिन्ह, मानपत्र आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

गेल्या सोमवारी कैलाश सत्यार्थी यांच्या दिल्लीतील घरात चोरी झाली होती. चोरांनी मौल्यवान दागिन्यांसोबतच नोबेल पुरस्काराची प्रतिकृती आणि मानपत्रही चोरलं होतं. या घटनेबाबत माहिती कळताच सत्यार्थी दुखावले होते. त्यावेळी ते काही कामानिमित्त अमेरिकेत होते. परंतु, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. त्यांच्या शोधमोहिमेला काल यश आलं. चोरट्यांच्या टोळीबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आज सकाळी त्यांनी रचलेल्या सापळ्यात तीन चोर अडकले आणि सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार सुस्थितीत सापडला.

बालहक्कांसाठी कार्य करणारे 'बचपन बचाव आंदोलन'चं प्रणेते कैलाश सत्यार्थी यांना 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणारी छोटी कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिच्यासोबत त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 01:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close