शशिकलांचा यू-टर्न, मुख्यमंत्रिपद झाले नकोसे !

शशिकलांचा यू-टर्न, मुख्यमंत्रिपद झाले नकोसे !

  • Share this:

sashikala_new11 फेब्रुवारी : तामिळनाडूतल्या राजकीय ड्रामानं आता वेगळंच वळण घेतलंय. व्ही के शशिकला स्वतः मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांच्या एका निष्ठावंताला त्या सीएम बनवू शकतात, अशी माहिती समोर येतेय.

पन्नीसेल्वम यांना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचून खुर्चीवर विराजमान झालेल्या शशिकला यांनी आता यू-टर्न घेतलाय.

शशिकलाचे निष्ठावंत  के ए शेगोट्टीयन किंवा एडपडी पलनीस्वामी यापैकी एक सीएम बनू शकतात. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढच्या आठवड्यात येऊ शकतो. दुसरं म्हणजे अम्मांची मैत्रीण म्हणून मुख्यमंत्री बनायचा हक्क मिळतो का. स्वतः आधी निवडून यावं, अशी भावना तामिळनाडूत जोर धरतोय. खास करून तरुणांमध्ये त्या लोकप्रिय नाहीयेत.

शशिकला सध्या चेन्नईबाहेरच्या एका रिसॉर्टमध्ये गेल्या आहेत. हेच ते गोल्डन बे रिसॉर्ट जिथे १२० आमदारांना त्यांनी डांबून ठेवलंय. इतके दिवस त्या हे नाकारत होत्या. पण आता त्या स्वतःच मोठा ताफा घेऊन तिथे गेल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 11, 2017, 6:00 PM IST

ताज्या बातम्या