S M L

मोदींना दुसऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावून पाहायला आवडतं -राहुल गांधी

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 02:28 PM IST

 मोदींना दुसऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावून पाहायला आवडतं -राहुल गांधी

11 फेब्रुवारी : पंतप्रधान मोदींना दुसऱ्याची जन्मपत्रिका वाचणं, गूगलवर सर्च करणे आणि दुसऱ्याच्या बाथरूममध्ये झाकून पाहणे जास्त आवडतं अशा  शेलक्या शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर शरसंधान साधलंय.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लखनऊमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर चांगलाच घणाघात केला. आजच्या इंटरनेट्या युगात कुणाचीही कुंडली फक्त एका क्लिकवर पाहता येते. पंतप्रधान आणि भाजपची लोकं जनतेची दिशाभूल करत आहे. पण, आपल्या राज्यात काय केलं हे सांगण्यासाठी ते पुढे येत नाही. पंतप्रधान मन की बात करतात पण काम की बात करत नाही अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.

तरदुसरीकडे मनमोहन सिंग यांच्यावर रेनकोट टीकेचा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. मोदींना लोकांच्या जन्म कुंडल्या वाचण्याचा छंद आहे. गूगलवर सर्च करणे आणि लोकांच्या बाथरूममध्ये झाकून पाहणे मोदींना जास्त आवडतं पण पंतप्रधान म्हणून त्यांच्यासाठी फायद्याचं नाही अशी टीका राहुल गांधींनी केली. तसंच उत्तरप्रदेशची जनता त्यांना चांगलाच झटका देईल असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 02:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close