S M L

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 09:54 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 64 टक्के मतदान

11 फेब्रुवारी :  उत्तर प्रदेशमध्ये आज पहिल्या टप्प्याचं शांततेतं मतदान पार पडलं.  एकूण ६4 टक्के मतदानाची नोंद झाली. तर शामली जिल्ह्यात सर्वाधिक 67 टक्के मतदान झालं. तर गाझियाबादमध्या 58 टक्के मतदान झाले.

आग्रा, अलिगड, बाघपत, बुलंजशहर, इटा, फिरोजाबाद, गाझियाबाद, हापूर, मथुरा आणि मेरठमध्ये आज मतदान झालं. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये तिरंगी लढत आहे. सपा आणि काँग्रेस युती, भाजप आणि बसपा अशी ही लढत आहे. सर्वात मोठं आव्हान आहे ते अखिलेश यादव यांच्यासमोर... ते सत्ता राखू शकतात की भाजप त्यांच्याकडून सत्ता खेचून घेतं, हे पाहायचं. मायावतींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण याआधी त्यांनी सरप्राईझेस दिलेले आहेत. त्यामुळे देशातल्या सर्वात मोठ्या राज्यात कोण सत्ताधीश होतं, ते 11 मार्चला कळेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 07:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close