S M L

दिल्लीच्या लव्हबर्डसची मेट्रोला पसंती

Sonali Deshpande | Updated On: Feb 10, 2017 03:35 PM IST

दिल्लीच्या लव्हबर्डसची मेट्रोला पसंती

10 फेब्रुवारी : प्रेम करावं खुल्लम खुल्ला,असं कितीही म्हटलं तरी आजही तरुण लव्हबर्डस् रस्त्यावर फिरताना दिसले की तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या कपाळावर आठ्या पडल्याच म्हणून समजा. दिल्लीत अशा तरुण-तरुणींनी मस्त पर्याय शोधलाय.

दिल्लीत प्रेमीयुगुलं भेटण्यासाठी सर्वात सुरक्षित म्हणून मेट्रोचा पर्याय निवडताना दिसतात. तिथे सीआयएसएफ सिक्युरीटी असते त्यामुळे त्यांना त्रास देणारं कुणी नसतं.

आपल्याकडे व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला की संस्कृतीरक्षकांचं प्रमाण अचानक वाढतं. एखादं जोडपं कुठेही एकांतात बसलेलं दिसलं की त्यांना मारहाण केली जाते. त्यांच्यासोबत वाद घातला जातो. अशावेळी त्यांना फिरणंही अवघड होऊन जातं. मात्र दिल्लीची लाईफलाईन असलेल्या मेट्रो स्टेशनवर फिरलात तर तिकडे तुम्हाला अशी अनेक जोडपी बसलेली दिसतील. त्यांना या जागी निवांत बसून एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळतो.

कधी कधी ते एका जागी न बसता मेट्रोतून प्रवास करत राहतात. पहाटे सुरू होणारी मेट्रोची ही सेवा रात्रीपर्यंत चालू असते. एकदा तिकीट काढलं की दोन-अडीच तास मस्त फिरता येतं. दिल्लीतल्या लव्हबर्डसनी फक्त व्हॅलेंटाइन डेपुरतं नाही,तर नेहमीच प्रेम करायला प्रेमळ मेट्रो शोधली तर!

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 10:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close