खुशखबर! पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पहिल्या गृहकर्जावर भरघोस सूट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 10, 2017 11:22 AM IST

sm-6-home-loan-oct5-1_647_092415060251

10 फेब्रुवारी :  गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. पहिल्या घरासाठी गृहकर्ज घेणाऱ्यांना केंद्र सरकार अनुदान देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या घरखरेदी सबसिडी योजनेत तपशील आता जाहीर झाले आहेत. त्यानुसार पहिले घर खरेदी करणाऱ्याला 20 वर्षे मुदतीच्या गृहकर्जावर तब्बल 2.5 लाखांचा फायदा होणार आहे.

ज्यांचं वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे अशा नागरिकांना सरकारकडून घर घेण्यासाठी 6.5 टक्कयांची सवलत मिळेल. त्यामुळे पहिलं गृहकर्ज जवळपास 2.5 लाखांनी कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र 20 वर्षांसाठी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठीच ही सवलत लागू असेल. या अनुदानामुळे गृहकर्जाचा महिन्याचा हप्ता जवळपास 2 हजार 200 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय गृहकर्जावरची करसवलतही कायम राहील. तर 12 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 4 टक्क्यांची सवलत मिळेल.

 उत्पन्न         अनुदान         हप्तात कमी         गृहकर्जात कमी

6 लाखांपर्यंत        6.5 टक्के   2219        2 लाख 46 हजार 625

Loading...

12 लाखांपर्यत         4 टक्के     2158     2 लाख 39 हजार 843

18 लाखांपर्यंत         3टक्के       2200     2 लाख 44 हजार 468

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 10:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...