मोदींच्या 'त्या 'विधानामुळे विरोधक भडकले, संसदेचं कामकाज ठप्प

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 9, 2017 04:39 PM IST

मोदींच्या 'त्या 'विधानामुळे विरोधक भडकले, संसदेचं कामकाज ठप्प

manmohan-modi-_647_060915023629

09 फेब्रुवारी : पंतप्रधान मोदींनी काल डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर काल (बुधवारी) संसदेच बोचरी टीका केली होती. यावर  संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसने मोठा गोंधळ घातला. पंतप्रधानांना अशी टीका करणं शोभत नाही, त्यांनी माफी मागावी, आणि माफी मागेपर्यंत आम्ही सभात्याग करत राहू,  अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

मोदींनी काल राज्यसभेत बोलताना, रेनकोट घालून अंघोळ करायची कला सिंग यांना चांगलीच अवगत आहे. त्यांच्या कार्यकाळात इतके घोटाळे झाले पण सिंग यांच्यावर एकही आरोप झाला नाही, असं म्हटलं होते. याविरोधात आज (गुरूवारी) लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी मोठा गोंधळ केला. यावेळी द्रमुक, सपा आणि जेडीयूनेही काँग्रेसला पाठिंबा दिला. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. संसदेचे कामकाज परत चालू केल्यानंतरही काँग्रेसच्या संसद सदस्यांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. राज्यसभेतही काँग्रेसने पंतप्रधानाच्या विधानाचा विरोध केला. त्यामुळे  उपसभापतींनी सभागृहाचं कामकाज 12 वाजेपर्यंत बंद केलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टिप्पणी ही संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी असल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. मोदी स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. संसदेत जो काही प्रकार घडला तो निराशाजनक आणि खरे बोलायचे झाल्यास लज्जास्पद होता,अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला.

तर दुसरीकडे, लेखक चेतन भगत याने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टीकेचं समर्थन केलं आहे. शांत स्वभाव असणं म्हणजे तुम्ही प्रतिष्ठित आहात असं होत नाही. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असल्याच्या काळातच देशाच्या इतिहासातले सगळ्यात मोठे घोटाळे झाले. पंतप्रधानांची मनमोहन सिंग यांच्यावरची टीका ही गंमतशीर पण चपखल बसणारी होती. आणि मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान होते एखादे लहान बाळ नाही की ज्यांच्यावर प्रत्येकाने पांघरूण घालावे. त्यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे, असं चेतन भगतने म्हटलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...