S M L

मनमोहन सिंगांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला अवगत-मोदी

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2017 10:56 PM IST

मनमोहन सिंगांना रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला अवगत-मोदी

08 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संसदेत नोटबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. त्याचवेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर  कडाडून हल्ला चढवला. रेनकोट घालूनही भिजण्याची कला मनमोहन सिंग यांना अवगत आहे, असं मोदी म्हणाले. यूपीए सरकारमध्ये एवढे घोटाळे होऊनही मनमोहन सिंग यांच्यावर मात्र भ्रष्टाचाराचा बट्टा लागला नाही, असं सांगत त्यांनी राज्यसभेत माजी पंतप्रधानांवर टीका केली.

नोटबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवस्थेचा गवगवा केला गेला आणि डिजिटल होण्यावर भरपूर पैसे खर्च झाले, असा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिलं. भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेणं गरजेचं होतं, असं मोदी म्हणाले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही नोटाबंदीचा प्रस्ताव आला होता पण त्यांनी तो स्विकारला नाही. एवढंच नाहीतर मोदी यांनी माधव गोडबोले यांच्या पुस्तकाचा हवाला देत जर त्यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर आज अनेक अडचणी दूर झाल्या नसत्या. गोडबोलेंच्या पुस्तकावर काँग्रेसने आक्षेप का घेतला नाही असा सवालही मोदींनी उपस्थिती केला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटबंदीवरून सरकारवर टीका केली होती. या निर्णयामुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावेल, असंही मनमोहन सिंग म्हणाले होते. पण मोदींनी त्यांना यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराची आठवण करून दिली.

मनमोहन सिंग यांनी सुमारे 35 वर्षं देशाची आर्थिक धोरणं आखली. पण तेव्हा सरकारने नोटबंदीसारखे निर्णय घेतले नाहीत याची आठवण मोदींनी करून दिली.  भ्रष्टाचारामुळे देशातल्या मध्यमवर्गीयांचं आणि गरिबांचं शोषण झालं. पण देशाची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही नोटबंदी करून कडक कारवाई केलीय, असं मोदी म्हणाले.  पंतप्रधान मोदींच्या या टीकेनंतर काँग्रेसने निषेध नोंदवत वाॅकआऊट केलं.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 08:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close