13 मार्चपासून बँकेतून हवे तितके पैसे काढा, 'नो लिमिट' !

13 मार्चपासून बँकेतून हवे तितके पैसे काढा, 'नो लिमिट' !

  • Share this:

bank_limit08 फेब्रुवारी : नोटाबंदीमुळे बँकेतून इतकेच पैसे काढा, तितकेच पैसे काढा या सर्व बंधनातून आता पुढच्या महिन्यात कायमची सुटका होणार आहे. 13 मार्चपासून बँकेतून हवे तितके पैसे काढता येणार आहे अशी घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केलीये. तसंच  20 फेब्रुवारीपासून बचत खात्यामधून तुम्हाला आता 50 हजार रुपये काढता येणार आहे.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर पैसे टंचाई निर्माण झाल्यामुळे बँक आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी मर्यादा घालण्यात आली होती. नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर हळूहळू मर्यादा हटवण्यात आल्यात. आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना दिलासा देत बचत खात्यातून आठवड्याला 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा वाढवलीये. त्याचबरोबर 13 मार्चनंतर तुमच्या अकाऊंटमधून हवे तितके पैसे काढता येणार अशी घोषणाही उर्जित पटेल यांनी केली.

तसंच रेपो रेट 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 इतकेच राहणार आहे. हे नवे चलनविषयक धोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदरात कोणतेही बदल केले नाही असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 8, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading