गरज पडली तर राजीनामा परत घेईन, पन्नीरसेल्वम यांची घोषणा

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 12:21 PM IST

गरज पडली तर राजीनामा परत घेईन, पन्नीरसेल्वम यांची घोषणा

paneer and shashi

08 फेब्रुवारी :  तामिळनाडूमधला सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. वेळ पडली तर मी राजीनामा परत घेईन, अशी भूमिका आता पन्नीरसेल्वम यांनी घेतली आहे.

दुसरीकडे, सूत्रांच्या माहितीनुसार राज्यपाल पन्नीरसेल्वम आणि शशिकला दोघांनाही बहुमत सिद्ध करायला सांगतील. पण असं झालं तर शशिकलांचा विजय पक्का आहे, कारण या क्षणाला तरी संख्याबळ त्यांच्याकडे आहे.

पन्नीरसेल्वम यांच्याकडे सध्या फक्त 22 ते 25 आमदार आहेत.

तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार भाजप यामध्ये कोणतीही भूमिका बजावत नाहीये. भाजपला पन्नीरसेल्वम हवे आहेत, पण तामिळविरोधी किंवा अम्माविरोधी अशी प्रतिमा भाजपला नकोय. त्यात शशिकला यांच्या पक्षाचे लोकसभेत 39 तर राज्यसभेत 13 खासदार आहेत. महत्त्वाची विधेयकं मंजूर करताना भाजपला अण्णा द्रमुकचा पाठिंबा गरजेचा आहे. त्यामुळे शशिकलांविरोधात उघड उघड काही करणं भाजपला महागात पडू शकतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...