S M L

भारतमातेची लूट करणाऱ्यांमुळे भूकंप - पंतप्रधान मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2017 05:46 PM IST

भारतमातेची लूट करणाऱ्यांमुळे भूकंप - पंतप्रधान मोदी

07  फेब्रुवारी :  धमकी तर फार पूर्वीच दिली होती. मात्र, अखेर भूकंप आलाच, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांवर उपरोधिक टीका केली.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान मोदींनी भूकंपाचा असा उपहासात्मक उल्लेख केल्याने विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात भाषणा दरम्यानच जोरजोरात विरोध केला. आपल्या भाषणात मोदींनी सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदीसह त्यांच्या सरकारने सामान्य माणसांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा यशाचा पाढा वाचला. अनेकवेळा त्यांनी विरोधी पक्षांना चिमटाही घेतला. आम्हाला निवडणुकीची नव्हे तर देशाची चिंता असल्याचेही मोदी यांनी या वेळी म्हटलं.


उत्तराखंडमध्ये काल (सोमवारी) रात्री झालेल्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या परिसरातील लोकांना सर्व प्रकारची मदत पोहोचवली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भूकंपाचा धागा पकडून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केले लक्ष्य. ते म्हणाले, धमकी तर फार पूर्वीच दिली होती. मात्र, अखेर भूकंप आलाच. जेव्हा कोणी घोटाळ्यामध्येही सेवा आणि नम्रता दाखवतो, तेव्हा धरणीमाता रुसते आणि भूकंप येतो, अशी टीकाही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान आणीबाणीचा उल्लेख करत म्हणाले,' या देशाची संपूर्ण लोकशाही एकाच कुटुंबाच्या हाती सोपवण्यात आली. देशाचे स्वातंत्र्य केवळ एका कुटुंबाने दिले असं यांना वाटतं, अशी टीकाही त्यांनी गांधी घराण्यावर केली आहे.  जेव्हा एखादा व्यक्ती घोटाळ्यातही सेवा आणि नम्रता पाहतो तेव्हा धरणीमाताही नाराजी होते आणि भूकंप होतो, अशी बोचरी टीका मोदींनी राहुल गांधींवर केली आहे.

नोटाबंदीवर विरोधकांनी 8 नोव्हेंबरपासून देशभर भाजपविरोधी रान उठवलं आहे. त्याचा समाचार घेताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या विधानाचा संदर्भ घेतला. काळा पैसा रोख रकमेत नाही, तर बेनामी मालमत्ता, सोन्या-चांदीत दडलेला आहे, असं खरगे यांनी आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं. त्याला मोदींनी जशाच तसं प्रत्युत्तर देत, काळा पैसा कुठे आहे, याची नेमकी माहिती आपल्याकडे (खरगेंकडे) कशी? जे बारकाईने आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करतात त्यांनी लक्षात घ्यावं की मे 2014 च्या आधी पैसा किती बाहेर गेला याची चर्चा व्हायची. आता, किती पैसा (भारतात परत) आला याची चर्चा होते आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात रोख पैशातून होते. बेनामी संपत्ती, सोने-चांदीच्या रुपात काळा पैसा जमा होतो. 1988 मध्ये काँग्रेसचे देशभर बहुमत होते, तेव्हा काँग्रेसने बेनामी संपत्तीचा कायदा बनविला. गेली 26 वर्षे काँग्रेसने हा कायदा संमत का केला नाही. आमच्या सरकारने हा कायदा संमत करून अंमलात आणायला सुरूवात केली.

Loading...

 छातीवर हात ठेवून स्वत:ला विचारा सर्जिकल स्ट्राईकच्या आधी 24 तास राजकारण्यांनी काय काय विधाने केली. आपल्या देशाच्या सैन्याचे जितके कौतूक करावं, तितके कमी आहे. इतका यशस्वी सर्जिकल स्ट्राईक आपल्याला (विरोधी पक्ष) त्रास देतो आहे, हे मला दिसतं आहे. आतल्या आत तुम्ही अस्वस्थ आहात. मात्र, लष्कर आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी सक्षम आहे, असं प्रतिपादन मोदी यांनी करताच काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत आरडाओरडा केला.

स्वातंत्र्यलढ्यात सावकर होते ज्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाददेखील होते. पण काँग्रेसला असेच वाटते की स्वातंत्र्य केवळ एकाच कुटुंबाने मिळवून दिले, समस्येचे मूळ हेच आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 01:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close