दिल्ली, उत्तराखंडसह उत्तरभारतात भूकंपाचे धक्के

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 11:48 PM IST

दिल्ली, उत्तराखंडसह उत्तरभारतात भूकंपाचे धक्के

earthquake43406 फेब्रुवारी :  दिल्ली-एनसीआर परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. रात्री 10.30 च्या सुमारास तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपास 30 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. 5.8 रिश्टर स्केलवर तीव्रता सांगण्यात येतेय. भूकंपाचं केंद्रबिंदू जमिनीपासून 07 किलोमिटर खाली होते.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,  भूकंपाचं केंद्रबिंदू हे उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमधील 7 किलोमिटर जमिनीखाली होते. भूकंपाचे धक्के काही वेळ जाणवल्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊन घराबाहेर पडले. भूकंपाचे झटके पंजाब, हरियाणासह संपूर्ण उत्तरभारतात जाणवले.

अजून पर्यंत कुठेही जीवितहानी आणि नुकसान न झाल्याचं वृत्त आहे. युपीमध्ये गाझियाबादमधील मेरठमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये लखनऊ,कानपूर,इलाहाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...