देशासाठी तुमच्या घरातून साधा कुत्राही गेला नाही - मल्लिकार्जून खरगे

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 07:31 PM IST

देशासाठी तुमच्या घरातून साधा कुत्राही गेला नाही - मल्लिकार्जून खरगे

Kharge banner

06 फेब्रुवारी :   महात्मा गांधी, इंदिरा गांधी देशासाठी बलिदान दिलं, पण तुमच्या घरातून कोण गेलं, साधा कुत्राही गेला नाही असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. भाजप खासदारांनी खरगे यांच्या विधानावर आक्षेप घेताच लोकसभा अध्यक्षांनी खरगे यांना समज देत हे विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.

लोकसभेत आज (सोमवारी) काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. भाजप सरकारवर टीका करताना खरगे यांनी वादग्रस्त विधान केल्याने भाजप खासदार आक्रमक झाले. ‘महात्मा गांधी, इंदिरा गांधी देशासाठी बलिदान दिलं, पण तुमच्या घरातून देशासाठी साधा कुत्रा तरी गेला होता का ?’ असा संतप्त सवाल खरगे यांनी उपस्थित केला. खरगे यांच्या विधानावर सत्ताधारी पक्षातील खासदारांनी आक्षेप घेतला. शेवटी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हस्तक्षेप करत खरगेंना समज दिली. तसंच यापुढे अशा स्वरुपाचे विधान सभागृहात करणं टाळा असं त्यांनी खरगेंना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...