आता प्रत्येक सिम कार्डसाठी 'आधार' आवश्यक - सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 02:01 PM IST

Supreme court of india

06 फेब्रुवारी :   प्रत्येक जुन्या आणि नवीन सिम कार्डसाठी आता आधार क्रमांक देणं बंधनकारक असणार आहे. सुप्रीम कोर्टाने आज (सोमवारी) केंद्र सरकारला प्रत्येक मोबाईल नंबरचं रेजिस्ट्रेशन आधार कार्डाशी जोडाण्याचे आदेश दिले आहे. तर केंद्र सरकारने एका वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करू, असं आश्वासन सुप्रीम कोर्टाला दिलंय.

लोकनीती संस्थेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. देशातल्या 105 कोटी सिम कार्ड्स पैकी 5 कोटी कनेक्शन्सची पडताळणी झालेली नाही. त्यासाठी सरकारनं पाऊलं उचलावीत, कारण पडताळणी न झालेली कार्डस् फ्रॉड किंवा देशविरोधी कारवायांसाठी वापरली जाऊ शकतात, असं या याचिकेत म्हटलं होतं. त्यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला आहे.

नव्या सिमसाठी 

* आधारची प्रत सक्तीची

Loading...

* इतर कागदपत्रांची गरज नाही

जुन्या सिमसाठी 

* आधार क्रमांक बंधनकारक

* मोबाईल गॅलरीत जाऊन आधारची प्रत द्या

* नाहीतर तुमचं सिम बंद होऊ शकतं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...