शशिकलांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 12:34 PM IST

शशिकलांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात

shashikala

06 फेब्रुवारी : शशिकला नटराजन या लवकरच तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.पण त्यांना काँग्रेस आणि द्रमुककडून विरोध होतोय.ज्या व्यक्तीसाठी जनतेनं मतदान केलं नाही, त्या मुख्यमंत्री कशा होऊ शकतात? २०१६ साली लोकांनी अम्मांसाठी मत दिलं, शशिकला अचानक मुख्यमंत्री कशा होऊ शकतात, असा सवाल काँग्रेसनं केलाय.

कुणीही येतं आणि मुख्यमंत्री होतं, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं विधान काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगेंनी केलंय.दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शशिकलाही सहआरोपी आहेत. खटला आता सुप्रीम कोर्टात आहे.त्यामुळे जर निर्णय शशिकलांच्या विरोधात गेला, तर त्यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात येईल.

कोण आहेत शशिकला नटराजन?

- जन्म : १९५७, मन्नारगुडी तामिळनाडू

Loading...

- आधीचा व्यवसाय : व्हिडिओ लायब्ररी चालवायच्या

- पती नटराजन तामिळनाडू सरकारमध्ये जनसंपर्क विभागात होते

- ८०च्या दशकात जयललितांशी ओळख

- १९८५पासून अम्मांच्या घरी वास्तव्य

- डिसेंबर २०११ : अम्मांनी घरातून काढलं

- मार्च २०१२ : दोघींमध्ये समेट

- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सहआरोपी

- अनेक नियुक्त्या आणि बदल्या शशिकला ठरवायच्या

- शेवटच्या क्षणापर्यंत अम्मांसोबत होत्या

- सध्या 'चिन्नम्मा' म्हणून ओळख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...