S M L

शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री,उद्या शपथविधी

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 05:16 PM IST

शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री,उद्या शपथविधी

05 फेब्रुवारी : जयललिता यांच्या निकटवर्तीय व्ही. के. शशिकला या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून सूत्रं घेणार आहेत. येत्या सोमवारी शशिकला तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अण्णाद्रमुकच्या आमदारांची चेन्नईमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत शशिकलांना विधानसभेतल्या पक्षाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आलं. विद्यामान मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी आज राज्लपालांकडे त्यांचा राजीनामा सोपवला.

जयललिता यांच्या निधनानंतर ओ. पन्नीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांच्या सल्ल्यानेच पदभार सांभाळलाय, असं तामिळनाडू मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याने सांगितलं.दरम्यान, जयललिता यांच्या काळातल्या मुख्य सचिव शीला बालकृष्णन यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. हे अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयात काम करत होते. या सगळ्या राजकीय घडामोडी जल्लीकट्टूच्या आंदोलनानंतर आणखी वेगाने घडल्यायत.

जल्लीकट्टूवरची बंदी उठवण्यासाठी निदर्शनं झाल्यानंतर तामिळनाडू सरकारने अध्यादेश काढला. त्यामुळे ओ. पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूच्या राजकारणात आघाडी घेतलीय. या सगळ्या आंदोलनाच्या काळात शशिकला काही बोलल्या नव्हत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 05:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close