S M L

स्मृती इराणींचा तेहसीन पुनावालांवर ट्विटरद्वारे लैंगिक टिप्पणीचा आरोप

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 02:54 PM IST

स्मृती इराणींचा तेहसीन पुनावालांवर ट्विटरद्वारे लैंगिक टिप्पणीचा आरोप

FOR WAB copy

05फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते तेहसीन पुनावालांवर ट्विटरद्वारे लैंगिक टिप्पणी केल्याचा आरोप केलाय. नेटवर्क 18ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी पुनावाला यांचे ट्विट्स दाखवून आपल्यावर वारंवार ट्विटरद्वारे टिप्पणी केली जात असल्याचा मुद्दा मांडला.

पुनावाला यांचे हे ट्विट्स फेब्रुवारी 2016 मधले आहेत.जेव्हा स्मृती इराणी या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री होत्या.त्यावेळी त्यांनी देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा अध्यादेश काढला होता. या निर्णयाला विरोध करणाचं ट्विट तेहसीन पुनावाला यांनी केलं होतं.'असं करा, एक ५६ इंचांचा पोल उभारा आणि त्याच्यावर काँडम लावा,' असा असभ्य शेरा पुनावालांनी मारला, असा आरोप इराणींनी केलाय.

तेहसीन पुनावालांनी हा आरोप साफ नाकारलाय. माझे वकील या आरोपाला उत्तर देतील, मी नेहमीच महिलांचा आदर करतो.. त्यांच्याविषयी मी कधीच आक्षेपार्ह बोललेलो नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 02:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close