S M L

आता 'नीट' चौथ्यांदाही देता येईल !

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 09:31 PM IST

neet_exam4 फेब्रुवारी : मेडिकल प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या नीट परीक्षेच्या संधी आता वाढवण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर ही परीक्षा अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देता येईल. सीबीएसईतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 साली परीक्षा दिल्यास हा पहिला प्रयत्न समजला जाईल.

याआधी नीट परीक्षा फक्त तीन वेळाच देता येत होती. परंतु यावर्षीपासून या संधी वाढवल्या जातील. नक्की किती संधी वाढवल्या जातील याबाबत मात्र बोर्डाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तसेच यावर्षी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेशही नीटच्या आधारावरच होतील. यापूर्वी या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी एआयपीएमटी ही परीक्षा घेतली जात असे. यावर्षी मात्र सर्व परीक्षा नीट अंतर्गतच होतील.

तीन वेळाच परीक्षा देण्याच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांना 27 मे 2017 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेचा अर्ज भरता आला नव्हता. परंतु आता सर्व विद्यार्थ्यांना हा अर्ज भरता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 09:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close