S M L

...नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत आणखीही सर्जिकल स्ट्राईक-राजनाथ सिंह

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 08:45 AM IST

...नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत आणखीही सर्जिकल स्ट्राईक-राजनाथ सिंह

 03 फेब्रुवारी : दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीतर पाकिस्तानच्या हद्दीत आणखीही सर्जिकल स्ट्राईक करेल, असा इशारा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिलाय. नेटवर्क 18 चे एडिटर इन चिफ राहुल जोशी यांनी राजनाथ सिंह यांची खास मुलाखत घेतली. यामध्ये राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. त्यावर भारताचा हा इशारा दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने दिलीय.

पाकिस्तानात लपलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमला भारतात आणण्याचं नक्की झालंय. त्यासाठी फक्त योग्य वेळेची वाट आम्ही पाहतोय, असं राजनाथ सिंह म्हणाले. आम्ही दाऊद इब्राहीमला भारतात आणू शकू याबद्दल मला आत्मविश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने गेल्या सप्टेंबर महिन्यात सर्जिकल स्ट्राईक केले होते. आता पुन्हा असे हल्ले आम्ही करणारच नाही याची खात्री नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावं, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलंय.लष्कर - ए- तोयबा चा म्होरक्या हाफीज सईदला नजरकैदेत ठेवल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. पण ही निव्वळ धूळफेक आहे, असं राजनाथ सिंग म्हणाले. पाकिस्तानने हाफीज सईदवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्याला गजाआड करावं, अशी मागणी त्यांनी केली.

संयुक्त राष्ट्रांतर्फे जैश - ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  चीनचा याला पाठिंबा नसल्यामुळे मसूद अझरला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात येत नाही, हे राजनाथ सिंह यांनी लक्षात आणून दिलं.

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत यायला बंदी घातलीय. त्यावर मात्र राजनाथ सिंह यांनी टीका करणं टाळलं. अमेरिकेतल्या परिस्थितीमुळे ट्रम्प यानी असा निर्णय घेतला असावा, असं राजनाथ सिंह म्हणाले.

Loading...
Loading...

राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीबद्दलही या मुलाखतीत खुलेपणाने उत्तरं दिली. उत्तर प्रदेशमधल्या 403 जागांपैकी भाजप 250 जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशमध्ये आपण मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही, असंही स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 09:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close