राजकीय पक्षांना कॅशलेस 'धडा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 03:28 PM IST

neta_salery01 फेब्रुवारी : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजकीय पक्ष आणि संस्था चांगलाच कॅशलेस 'धडा' शिकवलाय. राजकीय पक्षांना आता 2 हजारापेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही. 2 हजारांपेक्षा जास्त पैसे स्वीकारायचे असतील तर राजकीय पक्षांना चेकद्वारे किंवा डिजीटलमाध्यमातून पैसे स्विकारावे लागणार असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं.

राजकीय कारभारात पारदर्शकता यावी असं नमूद करत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजकीय पक्षांना कॅशलेसचा नारा दिला. राजकीय पक्षांना आता एका व्यक्तीकडून २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही. जर 2 हजारापेक्षा जास्त रक्कम घ्यायची असेल तर राजकीय पक्षांना चेकद्वारे किंवा डिजीटल माध्यमातून पैसे स्विकारावे लागणार आहे.

एवढंच नाहीतर राजकीय पक्षांसाठी आता आरबीआयमध्ये इलेक्टोरल बॅांडची सुविधाही उपलब्ध करून दिलीये. त्यामुळे तुम्हाला एखाद्या पक्षाला देणगी द्यायची असेल तर  आरबीआयकडून राजकीय पक्षांना हे बाँड विकत घेता येणार आहे. त्यामुळे यापुढे कुणी कोणत्या पक्षाला निधी दिला हे कळण्यास सोप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...