विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 02:55 PM IST

विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - पंतप्रधान

 

01 फेब्रुवारी : अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींचं अभिनंदन केलंय. विकासाला चालना देणारं बजेट, या शब्दात अर्थमंत्र्यांनी बजेटबद्दल समाधान व्यक्त केलंय.

मोदी म्हणाला, 'या बजेटमध्ये शेतकरी,नोकरदार, पायाभूत सुविधा या सगळ्यांचाच विचार केला गेलाय. मुख्यत्वे या बजेटमुळे ग्रामीण भागाला फायदा होणार आहे.' 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचंय,असं पंतप्रधान म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, 'या बजेटमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.सामान्य माणसाला गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता येण्यासाठी हा प्रयत्न आहे.आयकरामध्ये दिलेली सुट हा धाडसी निर्णय आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळाला.'

रेल्वे सुरक्षेवर भर दिल्याचंही मोदींनी नमूद केलं. तसंच असंघटित क्षेत्रातल्या लोकांना संघटित क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.

या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, डिजिटल व्यवहारामुळे काळ्या पैशाला आळा बसेल, हा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

हे बजेट तरुणांची स्वप्न पूर्ण करणारं आहे, बजेटमुळे बदलाला वेग मिळेल,असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...