अरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे

अरुण जेटलींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • Share this:

arun jaitley01 फेब्रुवारी : काळा पैशाविरोधात मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचं सर्वसमावेश बजेट सादर केलं. अर्थ आणि रेल्वे अर्थसंकल्प मांडताना जेटली यांनी डिजीटल होण्याकडे कल दिला. तसंच मध्यमवर्गीयांना दिलासा देत राजकारण्यांना कॅशलेस दणका दिलाय. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

 कररचना :

मध्यमवर्गाला दिलासा

3 लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त

2.5 ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर

एक कोटी पर्यंतच्या उत्पन - 10 टचक्के सरचार्ज

शेती :

ग्रामपंचायतींना ब्राॅडबॅंडनं जोडणार

गावांमध्ये महिला शक्ती .केंद्र उभारणार

आंगणवाडीटत महिलांना स्वयरोजगार शिक्षण देण्यासाठी 5000कोटींची तरतूद

गांवांमध्ये पाईपने पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष निधी

देशात 100 टक्के वीज 1 मे 2018 पर्यंत पोहचणार

ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे

2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली

ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार

मनरेगासाठी 48000 कोटी

मनरेगा योजनेतून 10 लाख तलावांतची निर्मिती करणार

1 मे 2018 पर्यंत सर्व गावांमध्ये वीज 4140 कोटींची तरतू़द

कृषी विम्याची रक्कम दुप्पट करणार

डेअरी प्रोसेसिंग इंन्फ्रास्ट्रक्चर साठी निधी

पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फसल बीमा योजना - 5500 कोटींचं अनुदान

शेतक-यांना कर्जवाटप करण्यासाठी अर्थसंल्पात १० लाख कोटींची तरतूद

यंदा कृषी विकासदर ४.१ टक्के राहील असा अंदाज. -

सहकारी संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणार

३ वर्षात नाबार्डसाठी २० हजार कोटींची तरतूद

टठिबक सिंचनासाठी अतिरिक्त ५००० कोटींची तरतूद.

रेल्वे :

रेल्वेचे ई-तिकिट खरेदी केल्यास सर्विस चार्ज लागणार नाही

2019 पर्यंत रेल्वेतली सर्व टाॅयलेट बायोटाॅयलेट

रेल्वच्या सुरक्षतेसाठी पुढील 5 वर्षांसाठी 1 लाख कोटी रुपयांची तर्तुद करण्यात आली

रेलवे कोचच्या अडचणींसदर्भात रेल्वे कोच योजना

7000 रेल्वे स्टेशन्स सोलार एनर्जीयुक्त करणार

पर्यटन आणि धार्मिक यात्रांसाठी विशेष लक्ष

1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधीची तरतूद

रेल्वे प्रवाशांसाठी रेल रक्षा कोषाची स्थापना

आगामी वर्षात रेल्वेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद

रेल्वे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणणार

2018 पर्यत 35000 रेल्वेमार्ग उभारणार

नवा मेट्रो रेल कायदा

राजकीय पक्ष :

राजकीय पक्षांना आता एका व्यक्तीकडून २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार  नाही

राजकीय पक्षांना चेकद्वारे किंवा डिडीटलमाध्यमातून पैसे स्विकारावे लागणार

राजकीय पक्षांसाठी आता आरबीआयमध्ये इलेक्टोरल बॅांडची सुविधा

आरबीआयकडून राजकीय पक्षांना हे बाॅंड विकत घेता येणार

कंपन्यांच्यादृष्टीने बजेट :

छोट्या कंपन्यांसाठी मोठा फायदा

50 कोटींपेक्षा कमी उलाढल कंपन्यांना प्रापर्टी टॅक्समध्ये सवलत

छोट्या कंपन्यांना टॅक्समध्ये 5 टक्के सवलत

रिअल इस्टेट :

कार्पेट एरिआनुसार घरांची किंमत

परवडणाऱ्या घरांसाठी नव्या योजना 20000 कोटींची तरतूद

पर,वडणाऱ्या घरांवर विशेष भर

लष्कर :

संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार ११४ कोटींची तरतूद

स्टार्ट अप पहिले तीन वर्ष आयकर मुक्त

जवानांना तिकीटं बुक करण्यासाठी विशेष सुविधा

इतर मुद्दे :

तीन लाखांच्यावर रोखीने पैसे देण्यावर बंदी

कोणत्याही सेवाभावी संस्थांना दिलाजाणारा निधीपैकी आता केवळ पहिले दोन हजार रुपये करमुक्त

एलआय़सीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

जमीन अधिग्रहणातून मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स नाही

पोस्टाच्या हेड आॅफिसेसमध्ये आता पासपोर्ट मिळणार

स्टार्ट अप पहिले तीन वर्ष आयकर मुक्त

पैसे बुडवून देशाबाहेर पळून जाणाऱया कायद्याच्या कचाटयात आणण्यासाठी नवे कायदे

भीम अ्ॅपच्या माद्यमातून अनेक ठिकाणी कॅशलेस व्य.वहारांची सुविधा

रेलवे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणणार

पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या  बजेटमध्ये सर्वाधिक निधी ,पायाभूत सुविधांसाठी 3,96, 135 कोटी

क्रूड अॉईलचे नवे साठे शोधणार

PPP माध्यामातून छोट्या शहरांमध्ये एअरपोर्ट उभारणार

2000 किलोमीटर सागरी मार्गांचा विकास करणार

राष्ट्रीय महामार्गांसाठी 64000 कोटी निधीची तरतूद

वेद्यकिय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी 25000 नवीन जागा

महिला शक्ती केंद्रांसाठी 500 कोटींची तरतूद

युवकांसाठी रोजगार निर्मीतीवर भर

भारतभरात 100 स्किल सेंटर्स

शाळांमध्ये परदेशी भाषांचं शिक्षण दिलं जाणार

माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी

विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम स्वयम

2019 पर्यंत गरीबांसठी 1 कोटी घरं उभारणार

तरूणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम नावाची योजना सुरू करणार.

माध्यमिक शिक्षणासाठी कल्पकता निधी उभारणार आणि भारतभरात एकूण १०० स्किल सेंटर्सची निर्मिती करणार

एफआयपीबी रद्दबातल होणार

वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षणासाठी २५००० नवीन जागा

वैद्यकीय आणि आयआयटीच्या प्रवेश परीक्षांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणार.

भीम अॅपच्या माद्यमातून कॅशलेस व्यवहारांची सुविधा तसंच व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅकची योजना

पासपोर्ट आता मुख्य पोस्ट कार्यालयातही मिळणार

'जीएसटी'च्या पार्श्वभूमीवर अबकारी कर आणि सीमाशुल्कात कुठलाही बदल नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 1, 2017, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading