S M L

मुस्लिम लीगचे खासदार ई. अहमद यांचं निधन, मात्र बजेट आजच!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2017 09:33 AM IST

मुस्लिम लीगचे खासदार ई. अहमद यांचं निधन, मात्र बजेट आजच!

01 फेब्रुवारी :  इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं काल (मंगळवारी) रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांपुढे ते भाषण करत असतानाच, ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते. तसचं, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ई अहमद यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.

ई. अहमद यांचा अल्प परिचय

  • ई. अहमद केरळच्या मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे खासदार
  • इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष
  • यूपीए सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री
  • केरळ विधानसभेसाठी पाच वेळा निवडून आले
  • लोकसभेत सहा वेळा निवडून आले
  • १९८२-१९८७ पर्यत केरळ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
  • अहमद युपीए-1 आणि यूपीए-2 च्या सरकारदरम्यान 10 वर्षे परराष्ट्र राज्यमंत्री होते

अर्थसंकल्प सादर होणार का?

दरम्यान, ई अहमद यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादरीकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. लोकसभा किंवा राज्यसभेच्या विद्यमान सदस्याचं निधन झाल्यास सामान्यतः त्यांना श्रद्धांजली वाहून संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं जातं. त्यामुळे आता आज सरकार बजेट सादर करायचं की नाही, याचा निर्णय सभापतींना घ्यावा लागणार आहे. त्यांना श्रद्धांजली वाहून अर्थसंकल्प सादर करायचा आणि नंतर कामकाज तहकूब करायचं, हा पर्यायही त्यांच्यापुढे असल्याचं जाणकारांनी सांगितलं. मात्र, काँग्रेसनं हिरवा कंदील दिलाय, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे अर्थसंकल्प आजच सारद होणार असल्याचं कळतंय. इंदिरा गांधींच्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close