आज संसदेत होणार अर्थसंकल्प सादर, टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल अपेक्षीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 11:30 AM IST

आज संसदेत होणार अर्थसंकल्प सादर, टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल अपेक्षीत

BRKING940_201702010828_940x355

01 फेब्रुवारी :  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदीय अधिवेशनात केंद्र सरकारचा चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचं बजेट हे वेगळं असणार आहे कारण यंदा पहिल्यांदाच रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट एकत्र सादर केलं जाणार आहे.

त्यामुळे जेटलींच्या पोटलीतून कुणाला काय मिळणार याची उत्सुकता लागली असून, काय महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भारतीय संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिना अगोदर अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटी विधेयकाची अमलबजावणी ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य आहेत. नोटबंदीनंतर देशात नोटांची टंचाई निर्माण झाली होती. पण एप्रिल 2017 पर्यंत ही टंचाई दूर होईल, असं दिसतंय. या अर्थसंकल्पात गृहकर्जावरच्या व्याजामध्ये आणखी सवलत आणि इनकम टॅक्समध्ये जादा सूट अशा घोषणा होऊ शकतात. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल सामान्य नागरिकांच्या मनात उत्सुकता आहे.

या बजेटची काही वैशिष्ठ्य पाहूयात... 

Loading...

 • नोटाबंदीनंतरचं पहिलं बजेट
 • विकासदर वाढवण्याचं मोठं आव्हान
 • महाराष्ट्रात पालिका आणि झेडपी निवडणुका
 • ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका
 • नोकऱ्या निर्माण करण्याचं मोठं आव्हान
 • याच वर्षात जीएसटी लागू होणार
 • तेलाचे दर कमी राहण्याचे दिवस गेले
 • ट्रम्प सत्तेवर, जागतिक परिस्थिती आव्हानात्मक
 • रेल्वेचं स्वतंत्र बजेट नाही

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज सादर होण्याआधी काल आर्थिक पाहणी अहवाल सादर झालाय. यात आर्थिक प्रगती मंदावण्याचा धोका व्यक्त करण्यात आलाय. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आणि निवडणुकांच्या धामधुमीत हा अर्थसंकल्प सादर होतोय. त्यामुळे अर्थसंकल्पाबद्दल यामध्ये आर्थिक प्रगतीचा दर मंदावण्याचा धोका व्यक्त करण्यात आलाय. देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न दर 7.5 वर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट होतं. पण हा दर 6.75 ते 7.5 या दरम्यान राहील, असा आर्थिक पाहणी अहवालाचा निष्कर्ष आहे. 2016 - 2017 या आर्थिक वर्षासाठी जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 7.1 टक्के होता, असंही यात म्हटलंय.

आर्थिक सर्वेक्षणात आणखी काय काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहुयात...

 • चालू वर्षात विकास दर म्हणजेच जीडीपी मंदावण्याची शक्यता
 • चालू आर्थिक वर्षात जीडीपी हा 6.5 ते 6.75 टक्के इतका राहाण्याचा अंदाज
 • गतवर्षी हा अंदाज 7.1 टक्के राहील असा वर्तवण्यात आलेला
 • नोटबंदीचा जीडीपीला फटका, नोकऱ्या कमी होणार, सामाजिक अस्थिरता राहाणार
 • नोटबंदीचा सर्वात मोठा फटका शेतीला, शेती उत्पन्नात घट होणार
 • खासगी मालमत्तेत घट होणार, रिअल इस्टेटच्या किंमती कमी होणार
 • रिअल इस्टेटच्या किंमती कमी झाल्यानं घरांची मागणी वाढण्याचा अंदाज
 • टॅक्सबाबत कडक धोरण अवलंबलं तर विश्वासार्हता धोक्यात येण्याची भीती
 • नोटबंदीनं निर्माण झालेली पैशांची चणचण मार्च अखेर पूर्ववत होण्याचा अंदाज
 • पुढच्या वर्षी म्हणजे 2018 साली जीडीपी 6.75 ते 7.5 टक्के राहाण्याचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 09:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...