S M L

आर्थिक सर्वेक्षण : जीडीपी घटणार, रियल इस्टेटमध्ये मंदी कायम राहणार

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 09:28 PM IST

आर्थिक सर्वेक्षण : जीडीपी घटणार, रियल इस्टेटमध्ये मंदी कायम राहणार

कौस्तुभ फलटणकर, दिल्ली

31 जानेवारी : देशाच्या जीडीपी येत्या आर्थिक वर्षात ६.७५ - ७.७० च्या दरम्यान राहणार तसंच नोटबंदीनंतर रियल इस्टेटच्या क्षेत्रात आलेली मंदी आगामी आर्थिक वर्षात देखील राहणार असल्याचा अंदाज केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षणात वर्तवला गेला आहे. आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणा नंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण संसदेसमोर ठेवला. त्यात या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत.

कृषी क्षेत्रात गेल्या आर्थिक वर्षात चांगली वाढ झाल्याचं या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मात्र, ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री यांनी घेतलेल्या नोटबंदी निर्णयाचा फटका कृषी क्षेत्रासह रियल इस्टेट क्षेत्राला बसला. कृषी क्षेत्रात काय बदल घडले या संदर्भात अहवाल तयार करण्यात येईल असं जेटली यांनी आज स्पष्ट केलंय. रियल इस्टेटमध्ये असलेली मंदी आगामी काही काळ अशीच राहील असे भाकित सुधा वर्तवण्यात आलं आहे. येत्या आर्थिक वर्षात नोकऱ्या वाढून बेरोज़गारी कमी होईल तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलची किंमत ६५ डॉलर प्रति बेरल पर्यंत गेली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसून तेलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता देखील सर्वेक्षणात वर्तवण्यात आली आहे.बुधवारी जेटली सर्वसामान्य अर्थसंकल्पासह रेल्वे बजट सादर करणार आहेत. यात सर्वसामान्य करदात्यांना तसंच रेल्वे संदर्भात ते काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मात्र जीडीपी वाढेल असा दावा करणाऱ्या सरकारला आत्ता विरोधकांचा विरोध सहन करावा लागेल असे संकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 05:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close