S M L

भाजपची औकात मतास ५०० रुपये, संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 01:18 PM IST

भाजपची औकात मतास ५०० रुपये, संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

31 जानेवारी : 'भारतीय जनता पक्ष या परीक्षेला काॅपी करून पास होतो. यावेळी त्यांना काॅपी करता येणार नाही. कारण आम्ही मास्तर लोक इथे आलोय. मनोहर पर्रीकर जे स्वत:चा टेंभा मिरवतात, भाजपची औकात मतास 500 रुपये आहे.' गोव्यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं साळगाव, कुंकणी आणि मुरगाव या तीन मतदार संघात उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सभा घेत आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही शिवसेना आक्रमक प्रचार करतेय.

गोवा भाजपची औकात मतास ५०० रुपये आहे. त्यांना आम्ही कॉपी करून पास होऊ देणार नाही. कारण शिवसेना परीक्षेत 'मास्तर' आहे, असं आव्हान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलंय. युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करण्याची एकही संधी सोडत नाहीयत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close