S M L

मनमोहन सिंग यांनी केली विजय मल्ल्याला मदत, भाजपचा आरोप

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 12:04 AM IST

Manmohan singh30 जानेवारी : विजय मल्ल्या यांच्या थकित कर्जावरून भाजपने सोनिया आणि राहुल गांधींवर हल्ला चढवलाय. 2011 मध्ये विजय मल्ल्याला मदत करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप केला, असा भाजपचा आरोप आहे. विजय माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सला यूपीए सरकारने अनेक सवलती दिल्या, असा आरोप भाजपने पत्रकार परिषद घेऊन केलाय.

विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला जे कर्ज दिलं गेलं त्याबद्दल त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम जबाबदार आहेत. सोनिया गांधींनीही विजय माल्या यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली, असं भाजपचं म्हणणं आहे.

विजय मल्ल्याच्या थकित कर्ज प्रकरणात सीएनएन न्यूज 18 नेच एक गौप्यस्फोट केला होता. किंगफिशर एअरलाइन्सला बेल आऊट पॅकेज दिल्याबद्दल विजय मल्ल्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना लिहिलेले मेल आणि पत्रं सीएनएन न्यूज 18 च्या हाती लागलीयत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करून मदत केल्यामुळेच आपल्याला मदत मिळाली, असं विजय मल्ल्याने या पत्रात म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 12:04 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close