S M L

1 फेब्रुवारीपासून एटीएममधून एकावेळी 24 हजार काढता येणार

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2017 09:00 PM IST

atm_new_Cash30 जानेवारी : रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा एटीएममधून पैसे काढण्याचा मर्यादेत वाढ केलीये. आता 1 फेब्रुवारीपासून एटीएममधून दिवसाला 24 हजार रुपये काढता येणार आहे. तसंट चालू खाते अर्थात करंट अकाउंटमधले पैसे काढण्याची मर्यादा हटवलीय. त्यामुळे करंट अकाऊंटमधून आता हवे तेवढे पैसे हवे तेव्हा काढणं शक्य होणार आहे. नोटबंदीनंतर करंट अकाऊंटमधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.

सेव्हिंग म्हणजे बचत खात्यातून मात्र आठवड्याला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम राहणार आहे. सध्या आपण सेव्हिंग अकाउंटमधून दिवसाला 10 हजार रुपये काढू शकतो पण आठवड्याची मर्यादा मात्र 24 हजार रुपयेच आहे.

नोटबंदीनंतर अजूनही काही एटीएममधून 500 रुपयांच्या नोटा मिळण्यात अडचणी येतायत. त्यामुळे 2000 रुपयांच्या नोटेचे सुट्टे पैसे मिळण्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. करंट अकाऊंटमधून एटीएमची मर्यादा हटवल्यामुळे उद्योजक आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2017 09:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close