S M L

उत्तर प्रदेशासोबत उत्तराखंड आणि गोव्यात विजय नक्की - अमित शहा

Sonali Deshpande | Updated On: Jan 30, 2017 10:45 AM IST

उत्तर प्रदेशासोबत उत्तराखंड आणि गोव्यात विजय नक्की - अमित शहा

29 जानेवारी : भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नेटवर्क 18 ग्रुपचे एडिटर इन चिफ राहुल जोशी यांना एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधल्या निवडणुकीवर मनमोकळी बातचीत केली.

या मुलाखतीत भाजप शिवसेना मतभेद, पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतली भाजपची रणनीती, नोटबंदीचा निवडणुकीवर होणारा परिणाम, आरक्षणावर भाजपचं मत, राजकीय भविष्य हे मुद्दे चर्चिले गेले.

अमित शहा म्हणाले की, '`सपा`तलं भांडण हा एक फॅमिली ड्रामा आहे.यादवीला उत्तर प्रदेशची जनता कंटाळली आहे.' भाजपला उत्तर प्रदेशात पूर्ण बहुमत मिळेल हा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, गेली 15 वर्ष उत्तर प्रदेश पिछाडीवर आहे. उत्तर प्रदेशची सुरक्षा वाऱ्यावर असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांचं धान्य विकत घेण्याची सुविधा देण्याचा वादाही त्यांनी केला.

Loading...
Loading...

अमित शहा यांनी नोटबंदीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला. याशिवाय बँकेतला काळा पैसा वाचणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

राममंदिराच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, घटनेच्या चौकटीतच राममंदिर बनेल, राममंदिर हा राजकारणाचा मुद्दा नाही, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप आरक्षणाच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी स्पष्ट केलं. पण धार्मिक आरक्षणाला मात्र विरोध दर्शवला.

भाजपमध्ये घराणेशाही नाही, असंही आपल्या मुलाखतीत म्हणाले. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे आणि घरातल्या भांडणाला लोक कंटाळले असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपश्रेष्ठींना मात्र युतीतला बेवनाव फारसा गंभीर वाटत नाही. भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाहीत पण मनभेद आहेत, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नेटवर्क 18 चे एडिटर इन चिफ राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत केलाय.भाजप शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत होईल. भाजप-सेनेत मतभेद आहेत, मनभेद नाहीत असंही ते म्हणाले.

गोव्यात पर्रीकर पुन्हा जाऊ शकतात, असंही ते म्हणाले. पंजाबमधली निवडणूक अटीतटीची होईल, असंही भाकित त्यांनी केलं.

आपलं पुढचं लक्ष्य 2019च्या निवडणुका आहेत, असं अमित शहांनी ठामपणे सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 10:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close