S M L

राहुल 'सायकल'चं दुसरं चाक - अखिलेश यादव

Sonali Deshpande | Updated On: Jan 29, 2017 07:02 PM IST

राहुल 'सायकल'चं दुसरं चाक - अखिलेश यादव

29 जानेवारी : उत्तर प्रदेशात निवडणुकीचं वातावरण अधिक तापत चाललंय.आज अखिलेश यादव आणि राहुल गांधींची संयुक्त पत्रकार परिषद लखनौत झाली.दोघंही पहिल्यांदाच एका मंचावर आले.

हा गंगा यमुनेचा संगम आहे, अशी भावना राहुल यांनी व्यक्त केली. अखिलेश प्रामाणिक आहे,म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले.

तर आम्ही लोकसभेत काम करताना आमची ओळख झाली.मैत्री झाली.आम्हाला उत्तर प्रदेशचा विकास हवाय, म्हणूनच आम्ही एकत्र आलो, असं अखिलेश म्हणाले. 300हून अधिक जागा जिंकू,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी हे 'सायकल'चं दुसरं चाक आहे, अशी भावना अखिलेश यादव यांनी व्यक्त केली.

Loading...
Loading...

उत्तर प्रदेशात आता प्रामुख्यानं तिरंगी लढत पाहायला मिळेल.भाजप, बसपा आणि सपा-काँग्रेस युती.उत्तर प्रदेशची जनता काय उत्तर देते, हे आता 23 मार्चलाच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 06:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close