S M L

परीक्षेचा कालावधी उत्सवाप्रमाणे साजरा करा - पंतप्रधान

Samruddha Bhambure | Updated On: Jan 29, 2017 02:32 PM IST

modi man ki baat

29 जानेवारी : परीक्षेचा कालावधी एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला तर विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही, यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनीच पुढाकार घेऊन पुढे यायला हवं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात या कार्यक्रमाचा हा 28 वा भाग होता. नववर्षातील मोदी पहिल्यांदात मन की बातमधून संवाद साधत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 लवकरच दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मोदींनी भाष्य केलं. गूण आणि गूणपत्रिका याचा उपयोग मर्यादित आहे, जीवनात तुम्हाला ज्ञान आणि कौशल्य कामी येणार असल्याचा मोलाचा सल्ला मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला आहे. जीवनात स्वतःशी स्पर्धा करा, दुसऱ्यांशी स्पर्धा करणं टाळा असं सांगताना मोदींनी सचिन तेंडुलकरचा दाखलाही दिला. सचिनने नेहमी स्वतःलाच आव्हान दिलं आणि यातून तो विक्रमांचे नवनवीन शिखर गाठू लागला याकडेही मोदींनी लक्ष वेधलं. त्याचबरोबर, पालकांनी मुलांवर आशेचे ओझे न लादता त्यांचा आहे तसा स्वीकार करावा असा, सल्ला मोदींनी दिला आहे.

परीक्षेच्या कालावधील कॉपीसारख्या गैरप्रकारांवरही मोदींनी भाष्य केलं. मोदी म्हणाले, कॉपी करताना कोणी पकडले नाही तरी तुम्हाला माहित असते की तुम्ही कॉपी केली आहे. त्यामुळे कॉपीसारख्या गैरप्रकाराकडे वळू नका असे आवाहन त्यांनी केलं. तुम्हाला एकदा कॉपीची सवय लागली की शिकायची इच्छा संपेल. कॉपी करण्यासाठी वेळ खर्च करण्याऐवजी आणि नवनवीन शक्कल लढवण्याऐवजी हाच वेळ आणि बुद्धी चांगल्या कामासाठी खर्च करा असंही मोदींनी सांगितलं.

Loading...

३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, या दिवशी सर्वांनी देशातील शहीद जवानांना आदरांजली अर्पण करावी असं आवाहन त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2017 12:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close