भाजपचं पुन्हा जय श्रीराम !

भाजपचं पुन्हा जय श्रीराम !

  • Share this:

bjp_menifestoकौस्तुभ फलटणकर / नवी दिल्ली

२८ जानेवारी : उत्तर प्रदेशात निवडणुकीची तारीख जशी जशीजवळ यायला लागली आहे राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेग वेगळ्या घोषणा करतात आहे. भाजपाने शनिवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून पुन्हा एकदा"जय श्रीराम" चा नारा दिला आहे. घोषणापत्राकडे बघून भाजप ही निवडणूक हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्यांवर लढणार हे स्पष्ट दिसतंय. भाजपने आश्वासन दिले आहे की उत्तर प्रदेशात त्यांचे सरकार आले तर संविधानिक मार्गाने राम मंदिर निर्माण केले जाईल. अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आणि कैराना सारखं लोकांना कुठल्या समुदायाच्या भीतीने गावं सोडून जाण्याची वेळ येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असं आश्वासन दिले आहे. तर तिनदा घटस्फोटाबद्दल मुस्लिम महिलांची न्यायालयात बाजू मांडू असं सुद्धा आश्वासन देण्यात आले आहे.

या घोषणा करून भाजपने संघ परिवार आणि उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. अखिलेश यादव यांच्या स्वछ चेहऱ्याला टक्कर देण्या साठी भाजपाने हिंदुत्वाला विकासाची फोडणी सुद्धा दिली आहे. प्रत्येक स्तरातील व्यक्तीला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात केला आहे. जर उत्तर प्रदेशात सरकार आलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे देणार, शेतकऱ्यांना कर्जावर व्याजाची सूट, शेतमजुरांना २ लाखां पर्यंत विमा देणार अश्या घोषणाकरून भाजपने शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मायावती आणि अखिलेश यांच्यावर आरोप असतो की ते सत्तेत आले की ते विशिष्ठ जातींच्या लोकांनाच नोकऱ्यांचा लाभ देतात. म्हणून भाजपने सर्व समजाकरिता दीड लाख पोलीस भरतीची घोषणा केली आहे. युवकांना आकर्षित करण्या करिता पाच वर्षात ७० लाख रोजगार देण्याचे आणि त्यातही ९० टक्के प्राधान्य उत्तर प्रदेशातील युवकांना देण्याचे भाजपचं आश्वासन आहे.

मुलींना ग्रॅजुऐशन प्रयन्त मोफत शिक्षण, पन्नास टक्के घेणाऱ्या विद्यार्थ्यांना   ग्रॅजुऐशनपर्यंत मोफत शिक्षण देण्याचे सुद्धा आश्वासन आहे. या शिवाय अखिलेशच्या लॅपटॉप आणि मोबाईल योजनेला टक्कर देण्याकरिता भाजपने सर्वांना मोफत लॅपटॉप आणि एक वर्षां पर्यंत १ जीबी डेटा फ्री देण्याचे आश्वासन दिले आहे. तसंच १० अत्याधुनिक विद्यापीठ स्थापन करण्याचे  आश्वासन देखील देण्यात आले आहे. महिलांसाठी भाजपने घरा घरात एलपीजी, फास्टट्रॅक कोर्ट, सुरक्षेकरिता १५ मिनिटात पोलीस हजर होतील आणि महिलांच विशेष पोलीस पथक गावा गावात निर्माण केले जातील असं म्हटलं आहे. तर गुंडगिरी आळा घालण्याकरिता  जामिनावर मुक्त असलेल्या आणि गुंडागर्दी करणाऱ्या चाळीस हजार गुंडांना ४५ दिवसात कारागृहात घालणार, भ्र्रष्टाचार मुक्ती साठी विशेष टास्क फोर्स निर्माण करणार, घरी मुलगी जन्माला अली तर पाच हजार तत्काळ देणार, उत्तर प्रदेशातील तीर्थक्षेत्रांना जोडण्याकरिता हेलीकाॅप्टर सेवा सुरू करणार. लखनऊ आणि नोएडा मेट्रोचा विस्तार करून कानपूर आणि गोरखपूर येथे ताबडतोब मेट्रो सुरू करणार अश्या प्रकारचा घोषणांचा पाऊस भाजपने आपल्या जाहीरनाम्यातपाडला आहे.

खास गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उम्मेदवार घोषित केलेला नाही. अश्यात अखिलेश आणि मायावती सारख्या मात्तबर चेहऱ्यानं विरोधात टक्कर द्यायला भाजपला मोदींचा चेहरा हिंदुत्व आणि विकास या एकत्रित केलेल्या रसायनाची कास आहे. आत्ता उत्तर प्रदेशातील जनता भाजपच्या या आश्वासनांवर विश्वास ठेऊन भाजपचा १४ वर्षांचा राजकीय वनवास संपवणार का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 28, 2017, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading