... म्हणून काही वेळ सत्तेत राहावं लागेल - संजय राऊत

  • Share this:

sanjay_raut_on_bjp

26 जानेवारी : शिवसेना महाराष्ट्रात कुणाशीही युती करणार नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं. पण उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर राज्यभर आता एकच चर्चा सुरू झाली, आणि ती म्हणजे शिवसेना सरकारमधूनही बाहेर पडणार का? पण या प्रश्नावर सावध आणि सूचक भूमिका घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, अजून काही दिवस तरी आम्हाला सत्तेत राहावं लागेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला महाराष्ट्राला अस्थिर करायचं नाही. त्यामुळे आम्हाला काही काळासाठी राज्यातील सत्तेत सोबत राहावं लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री लगेचच राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आढावा बैठकीवर शिवसेना खासदारांनी बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असून या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 27, 2017, 11:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading