काश्मीरमध्ये हिमस्खलनात 10 जवान शहीद

काश्मीरमध्ये हिमस्खलनात 10 जवान शहीद

  • Share this:

kashmir3426 जानेवारी : काश्मीरमधल्या गुरेज क्षेत्रात झालेल्या हिमप्रपातामध्ये 10 जवान शहीद झाले. बांदिपोरा जिल्ह्यातल्या लष्करी छावणीवर हिमकडा कोसळला. यामुळे लष्करी छावणीत 17 जवान अडकून पडले होते.  बचावकार्यामध्ये 7 जवानांना बाहेर काढण्यात आलं. पण या दुर्घटनेत 10 जवानांचा मृत्यू ओढवला.

हिमप्रपातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटंय. काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये बुधवारीही हिमप्रपाताची घटना घडली होती. यात एका लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू ओढवला होता.

काश्मीरमध्ये सध्या जोरदार हिमवृष्टी होत असल्यामुळे आणखीही हिमप्रपाताच्या घटना घडू शकतात, असा अलर्ट जारी करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 07:47 PM IST

ताज्या बातम्या